Sunday, October 9, 2011

तू विसरू शकणार नाहीस...

तू विसरू शकणार नाहीस...
नदीचा काठ चमचमतं पात्र
उतरता घाट मोहरती गात्रं...

तू विसरू शकणार नाहीस...
कलंडता सूर्य लवंडती सांज
पक्ष्यांच्या माळा किणकिणती झांज...

तू विसरू शकणार नाहीस...
सोनेरी उन्हं वार्‍याची धून
पावलांची चाहूल ओळखीची खूण...

तू विसरू शकणार नाहीस...
दिलेला शब्द ओझरता स्पर्श
दडलेलं प्रेम ओसंडता हर्ष...

तू विसरू शकणार नाहीस....
हातात हात अन तुझं माझं हितगुज
आंब्याच्या झाडावर पाखरांची कुजबुज...

तू विसरू शकणार नाहीस...
भिजलेले डोळे विरलेली स्वप्नं
थिजलेली वाट उरलेले प्रश्न...

तू विसरू शकणार नाहीस
...
अन मीही विसरू शकणार नाही...


आभार : सुप्रसिद्ध कवी : श्री. प्रसाद कुलकर्णी

Saturday, October 1, 2011

आठव...

न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
नैनी अश्रू तुझ्या त्या न राही कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे

उरे मन तुझ्याच साठी
झुरे मन तुझ्याच पाठी
तुझ्या पाठी ते धावत राही
वाट आशेने पाहत राही
अधरी ते धुमसून जाई
कोणास कसे समजावे

न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
नैनी अश्रू तुझ्या त्या न राही कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे

तू जग तुझ्याच साठी
जग हे तुझ्याच साठी
मन माझे मी मारत जाई
दिन रात स्मरण तुझे राही
कसे पांग हे फेडू तू पाही
कोणास कसे समजावे

न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे
नैनी अश्रू तुझ्या त्या न राही कोणास कसे समजावे
न तुज आठव माझी येई कोणास कसे समजावे