Tuesday, August 23, 2011

कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.......

कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.........

साधी सोज्वळ निरागस होती
पण जगाचे भान मित्रत्वाची सान
चांगलेच ओळखून होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी
हातात हात नसेल कदाचित
पण डोळ्यानेच मला समजून घेत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते
फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो
ती हि कधी हा विचार करत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा
कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो
माझ्या साठी वाट पाहत गेट बाहेर उभी होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी आहे का
पण दुसरे मन मित्ररेखेच्या आतच खेचायचे
ती बिचारी मनात माझी मित्रताच सांभाळत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

माझ्या मित्र मला तीच नाव घेऊन चिडवायचे
एकदा तर गोष्ट हातघाईवर आली
हात खेचून मला घोळक्यातून बाहेर घेऊन आली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.......

..हे नाते निखळ मैत्रीचेच होते
प्रेमापेक्षा अधिक महान होते
कधी एकमेकांकडून तश्या प्रेमाची अपेक्षाच केली नव्हती.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती......

...आता मात्र वाटत मैत्रीचे प्रेमात रुपांतर का होते
तिला स्वच्छंद जगण्याचा हक्क नव्हता का
कि मला मित्र बनवणे का तिची चूक होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.

एकदा मित्रांच्या सांगण्यावरून तिचा हात धरला होता
गम्मत म्हणून केले होते सगळे पण हसे तिचे झाले
एका शब्दा ने मला ती काही बोलली नव्हती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.

आजकाल मी एकटाच जातो कॉलेजला
परवा पासून कोणी वाट हि पाहत नव्हत गेट जवळ
तेव्हा मित्र विचारत होते कि ती कुठे होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.

मला वाटल कि काय करून बसलो
मित्रांचा सांगण्यावर चांगला मैत्र गमावून बसलो
ती काल भेटली तेव्हा म्हणाली सख्या मी तर बाहेर गेली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

क्षमा मागितली असती मी तिची
पण तरी हसून वेडा आहेस का म्हणून गेली
आता पुन्हा ती माझ्या गेट जवळ दिसली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती

जाते म्हणतेस.............

जाते म्हणतेस...................

जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा

नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा

भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा

हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा

जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा

छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................

घन घोर मराठी पोर

घन घोर मराठी पोर जातीची थोर लढाया आज पुढे
धार पातीची वार छातीची ढाल धराया आज पुढे

सात वेडे ते घाट मोडे जे आज मराया आज पुढे
वीर थोडे ते प्राण सोडे जे लाज धराया आज पुढे

धर्म रक्षिला मान बक्षीला कृथार्थ झाहलो आज कुठे
सत्य निश्ठीला विठ्ठल भक्तीला पावन पडलो आज कुठे

बाजी भक्तीला जीवा जातीला अमर जाहला आज इथे
आज लाभला शिवा मातीला स्वराज घडला आज इथे

आज मराठी कसा जागतो कोण साधतो राज इथे
कसा वागतो असा नाचतो कोण पहाया आज इथे

पुन्हा शिवाजी पुन्हा शिवाजी जयघोष चालला आज जिथे
जो तो मातला स्वार्थात गुंतला खेळ मांडला आज इथे..........................
आरती स्वामी अण्णा
महामेरू व्रत जगिया
सेविती जन लोक
मनु वेधला देशा
आरती स्वामी अण्णा..

लोकपाल अर्ज बोले
वेठी शासनी धरले
अवतार गांधीबाबा
दिन दुखांच्या नाथा
आरती स्वामी अण्णा
महामेरू व्रत जगिया
सेविती जन लोक
मनु वेधला देशा
आरती स्वामी अण्णा..

मैदानाचे रण करी
उभे भूषण हे दारी
किरण,अरविंद हो
रामदेव गायन करी
आरती स्वामी अण्णा
महामेरू व्रत जगिया
सेविती जन लोक
मनु वेधला देशा
आरती स्वामी अण्णा..
प्रकट मिडिया बोले
अनशन अण्णांनी केले
बैठका संसद सदनी ,त्यांनी मस्तक टेकिले
आरती स्वामी अण्णा
आरती स्वामी अण्णा
महामेरू व्रत जगिया
सेविती जन लोक
मनु वेधला देशा
आरती स्वामी अण्णा..

Monday, August 22, 2011

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते ....

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

तू जेव्हा सोडून गेलीस तेव्हाच वधलो..... उरलो देहापुरता, उरले शरीर, उरल्या त्या आठवणी....

आठवते तुझे हास्य, आठवतो तुझा श्वास
आठवतात तुझे नेत्र, आठवतो तुझा त्रास
तुझे ते हासुनी पाहणे, डोळ्यांनी विचारणे
क्षणात जवळ येणे, क्षणात सोडून जाणे

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

आठवतात ते क्षण जेव्हा समजूत तुझी नाराजी माझी, आता मनाची नाराजी, अश्रूंची समजूत, तुजवीण हि अवस्था माझी.....
कळसावूनी टाकले माझे सुख मी कधीचे
जन्मताच ते पूजले दुख मी पाचवीचे
आता उडे राख स्वप्नांची ती धुमसत
दिनरात रडे एक विराणी घुसमट

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

देह हा शांत निपचित एका स्मशानी, वाऱ्यामध्ये विरत आहे एक उदास विराणी......

उरले मन हे बेवारस प्रेत माझे
बसले उकिरडे झीझवीत ते तुझे
तुटलेली ती सांज, तुटलेले नाते
तुटलेल्या वाटा, आणि तेव्हा जाग येते.....
.
.
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

जाग आली पण पुन्हा डोळे मिटतील, तुझ्या विना जगण्यात सारी वर्ष सलतील... भ्रष्ट ते दिवस... नासलेल्या सांजा, आणि ती विटाळलेली पहाट..

Wednesday, August 17, 2011

एक मैत्र जसा मज तू लाभते...

एक पहाट विस्मय तू भासते
तुझे हास्य मन पुन्हा मागते
स्वच्छंद रहातो मी दुख विसरुनी
एक मैत्र जसा मज तू लाभते

का इतके मनी दुख लपवितेस
हास्य मुखवटा पण श्वास कोंडतेस
ओळखून आहे ते सत्य आतुनी
अनंती सर्वस्व तुझे, तू तिलाच आठवतेस

असे नेत्र मज अर्थ सांगतात
तुज हून अधिक मज तेच भेटतात
वेळ काळ मी विस्मरुनी जातो
दिनरात शब्द हे तुलाच स्मरतात

असा श्वास जर तुझा मी असतो
तुझा उछ्वास तो मला समजतो
पाउले चालता ती तुझ्या बरोबर
तुझा मैत्र मी, गर्व भासतो...

Sunday, August 14, 2011

कधी सांजवेळी...

कधी सांजवेळी मनी माझ्या उतरुनी ये
कधी रातवेळी मनी माझ्या उतरुनी ये
अशी ये ना निकट माझ्या कि मिठीतून सोडवेना....

कधी सांजवेळी मनी माझ्या उतरुनी ये
कधी रातवेळी मनी माझ्या उतरुनी ये

तू नाही, तर तुझ्या, पुरतील त्या, आठवणी
मन दुखे, मन जळे, डोळी साचे, पाणी
तू तर माझा श्वास आहेस
तू माझा एक ध्यास आहेस
अशी ये ना निकट माझ्या कि मिठीतून सोडवेना....

कधी सांजवेळी मनी माझ्या उतरुनी ये
कधी रातवेळी मनी माझ्या उतरुनी ये

रात दिन,माझे मन, जळते ग, धुमसुनी
तुज विना,जीव माझा, तडफडे, राहुनी
तू तर माझे गीत आहेस
तूच माझी प्रीत आहेस
अशी ये ना निकट माझ्या कि मिठीतून सोडवेना....

कधी सांजवेळी मनी माझ्या उतरुनी ये
कधी रातवेळी मनी माझ्या उतरुनी ये

Saturday, August 13, 2011

कसे सरतील....

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?


-sandeep khare

तुझ्या वीण जिणे नसे.......

तुझ्या वीण जिणे नसे
कि तुझ्या वीण जिणे नसे.......

कि तुझ्या वीण जिणे नसे
कि तुझ्या वीण जिणे नसे
.
.
.
.
.
.
.
नजरा वेधती ज्याला, तो तर तुझा चेहरा
हृदयी स्पंदने वाजता , पण असती ती उगा
मी तर बर्फ ठरलो असा, जो शुष्क झालेला
तुझा दाह हा विटाळे, रोज सांजेला...

ढाळे किती अश्क मन हे, सदा
श्वास काळजात रुततो, आता
हासुनी सहय हे सर्वदां....

दुख तरी राहुदे तुझे हृदयी आता
पुष्प पाउली माझ्या, त्या कंटकी वाटा....
ह्यांची आता मला भीती नसे.........

कि तुझ्या वीण जिणे नसे
कि तुझ्या वीण जिणे नसे

नजरा वेधती ज्याला, तो तर तुझा चेहरा
हृदयी स्पंदने वाजता , पण असती ती उगा
मी तर बर्फ ठरलो असा, जो शुष्क झालेला
मला सूर्य तो विटाळे, रोज सांजेला...

तुझ्या आठवा त्या वार करी
तुझा स्पर्शाची आंस धरी
पडके घर, मन विराण करी

सहय आहे मला, छळ किती हा तुझा
नाराजी हि तुझी, अबोला पण तुझा...
सुख आज मला हे अवगत नसे

कि तुझ्या वीण जिणे नसे
कि तुझ्या वीण जिणे नसे

नजरा वेधती ज्याला, तो तर तुझा चेहरा
हृदयी स्पंदने वाजता , पण असती ती उगा
मी तर बर्फ ठरलो असा, जो शुष्क झालेला
मला सूर्य तो विटाळे, रोज सांजेला...

कि तुझ्या वीण जिणे नसे
कि तुझ्या वीण जिणे नसे....

Wednesday, August 10, 2011

तुज विन जीवन

तुज विन जीवन कसे हे
कसे हे जीवन तुझ्या विन

रात्र थांबेना हि सगळी
अस्ती पावे ना माझे दिन

ये ना..
परत तू ..
मन हे हाके तुला

तुज विन जीवन कसे हे
कसे हे जीवन तुझ्या विन

पुन्हा अवकळा आज आली
पुन्हा तुला आठवे मन
पुन्हा मन धावे तुझ पाही
पुन्हा छळ करू लागले सण
पुन्हा छळ करू लागले सण

हे मन तुझे प्रतिबिंब असे
तुझ विन जीवन हे व्यर्थ असे

ये ना..
परत तू ..
मन हे हाके तुला

तुज विन जीवन कसे हे
कसे हे जीवन तुझ्या विन

किती स्वप्ने मन हे पाही
किती अश्रू दिन रात ढाळी
किती पाझरे हे तुझे मन
किती श्वास मोजत राही
किती श्वास मोजत राही

मनी रोज वादळे हि सरती
तुझ विन न जीवन हे उरती

ये ना..
परत तू ..
मन हे हाके तुला

तुज विन जीवन कसे हे
कसे हे जीवन तुझ्या विन ...

Tuesday, August 9, 2011

तुज विना, मन राधे...

तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना

बैचेन हा उनाड वारा, माझे मन, गोठवे......
निखळे हा तारा, वेगाने असा, हा क्षण, पोखरे.....
त्यास ना मी दिसावे, झाकुनी तुज बटाने
त्यास ना मी दिसावे, झाकुनी तुज बटाने

तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना

त्यास दडवूनी आलो असा हा, तुझ्या, संग मी......
इंद्रधनूची जणू सावली तू, तुझा , रंग मी......
तुझे लक्ष स्मरो मी, तुझा वेध ठरो मी,
तुझे लक्ष स्मरो मी, तुझा वेध ठरो मी,

तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना
तुज विना, मन माझे, उरते ग, विराणे
मन राधे, तू ये ना, हृदयी हात जवळ घे ना..

Sunday, August 7, 2011

अवेळीचा पाऊस आणि तू ......

अवेळीचा पाऊस आणि तू ......

अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू

धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू

मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू

रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू

अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
जसं वर्षभराचं एकदम बोलणारी तू

झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू

अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू

अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू !

Saturday, August 6, 2011

तुज विन...

तुज विन.........

तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन
तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन

येती तुझ्या आठवणी, राती माझ्या मनी,
बोले माझ्या सवे, तुज मुखी चांदणी
विशंध या, तुझ विन दाही दिशा
पाहून घे माझी धुमसत दशा

उजाड मी वैराण मन
अश्रू वाटा शोधती
ये आज तर माझ्या सोबती
जगणे नसे तुज विन.....

तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन
तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन

तुला कधीचे स्मरी, डोळे माझे दोन्ही
तुला कधीचे स्मरी, डोळे माझे दोन्ही
चूक न होऊनी, तू भेटशी का कुणी

विस्मरणे, न मज, तुझ्या कथी,
उरलो मी, हा, निशिदिन व्यथी

का श्वास घेऊ , का मी जगू, जगणे चुकीचे ठरे.
का झाली तू, माझी वेदना, सांग आज तू हे खरे....
तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन
तुज विन, का हे जीवन, का हे जीवन तुज विन