Sunday, May 29, 2011

बिल्डर कसे व्हावे.............

बिल्डर कसे व्हावे.............

नमस्कार !!........

आज आपणास मार्गदर्शन करणार आहे बिल्डर कसे व्हावे.

काही जणांच्या मते बिल्डर बनणे हि फारच किचकट गोष्ट आहे . आम्ही म्हणतो
कठीण आहे पण जर आपण इतर यशस्वी बिल्डर पाहिलेत व त्यांचा पायावर पाय
ठेवून जर बांधकाम व्यवसायाची माहिती घेतलीत, तर नक्कीच हा व्यवसाय फलदायी
व क्लेश रहित आहे. इथे आपणास मुद्देसूद व सकल मार्गदर्शन केले आहे, पण
अर्थात हे आजकालच्या जगतातले शिक्षण आहे, व ते आजकालच्या प्रमाणेच
अवलंबिले पाहिजे. बाकी आपल्या तोंडी गरज आहे ती फक्त अरेरावीच्या
भाषेची.....

PLOTTING पलोटिंग -

सर्वप्रथम एक शहरमध्य अडगळीतली एखादी झोपडपट्टी पहावी ,
व तेथे ती आपल्याच पितरांची आहे. तसा आपल्या बांधकाम कंपनीचा बेधडक बोर्ड
लावावा. व सदरला कुंपण घालावे.जर कुणी कागदपत्रे पाहण्याचा हट्ट केल्यास
त्याला सरळ बनावट कागदपत्रे सादर करावीत (अनेक ठिकाणी उपलब्ध किंवा
आम्हाला संपर्क साधणे-व्यंग. ). त्या नन्तरच्या त्रासाला सामोरे
जाण्याकरता इतर साधने असतील तर हा त्रास होत नाही हे देखील खरेच.
त्या नंतर कुठला
महानगरपालिकेचा व पालिकेचा इसम आलाच तर त्याची योग्य ती उठबस करावी व
त्यास सम्मान द्यावा.
नंतर त्याच्या खिशात त्याला संतोषजनक रक्कम कोंबून त्याला व त्याचा
वरीष्ठासव्यक्तिगत भेटणे करावे व तिथेच त्यांचा आकडा विचारावा व त्यांना
वाटा देण्याचे आश्वासन द्यावे. त्यांनतर तिघांनी एका छानश्या बार मध्ये
(शक्यतो लेडीस बार) बसावे. हे केल्याने त्यांची व तुमची घनिष्ट अशी
बांधिलकी तर निर्माण होतेच व ह्या पुढील कामात सरकारी अडचणी येत नाहीत.

SLUM RELOCATION (rehabilitation) झोपडपट्टी उठवणे-

झोपडपट्टी उठवणे हि अजिबात अवघड गोष्ट नाही . प्रथम १०-१५ अट्टल
गुन्हेगारी प्रवृत्तीची(गुंड) माणसे जमवावीत, व झोपडपट्टीमध्ये राहण्यारा
अनेक पुढे पुढे करणारया शहाण्यांना सामुदायिक चोप द्यावा, असे केल्याने
झोपडपट्ट्या ,चाळी हवी त्या किमतीत रित्या करून घेता येतातच त्याचबरोबर
इतर जणांवरहि धाक जमतो, व बिल्डर बद्दल दहशत वजा आदर निर्माण होतो.
(मुंबई मध्ये अनेक उदाहरणे आहेतच.)

बिल्डर व गुंड ह्यांचे रेशीमबंध फारच जुळलेले असतात प्रत्येक कामी
गुंडांची मदत प्रत्येक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाला हवीच असते आमचा
तर आग्रह हा आहे की २०-२५ गुंड हे प्रत्येक बिल्डरने पदरी बाळगलेच
पाहिजेत याने बिल्डरची प्रतिमा उंचावते.

BOOKING बुकिंग-

बुकिंग करण्या हेतू सर्वप्रथम एक छान प्रशस्त
"शॉप" भाड्याने घ्यावे (दुकान संबोधल्याने त्याचा भपका कमी होतो). हे
"शॉप" एखाद्या मध्यमवर्गीय पण गजबजलेल्या लोकवस्तीत असावे.बांधकामावर
पैसा खर्च केला नाही तरी पण हे कार्यालय वजा "शॉप" भपकेबाज असलेच पाहिजे
, ज्याने बिल्डरला आपले आकडे सांगण्यास संभाव्य ग्राहकाकडून मज्जाव होत
नाही.
ऑफिसमध्ये आल्या आल्या
ग्राहकाचे हसून स्वागत करावे व त्यासाठी शीतपेये वा कॉफी (चुकूनहि चहा
मागवू नये. ) असे आदरतिथ्य झाल्यामुळे ग्राहक भुलतो व त्यास फशी पाडणे
सोपे जाते. त्या नंतर आपला प्लॉट त्यावरील बांधकाम ह्या गोष्टींबद्दल
त्याला वरचेवर माहिती द्यावी व त्याचा काही शंकांना धडधडीत खोटे उत्तर
द्यावे. त्याच बरोबर सर्वात वरील व तळमजला वरील फलाट लवकर विकले जात
नाहीत म्हणून संपूर्ण बिल्डिंग बुक आहे फक्त सर्वात वरील व तळमजल्यावरचे
फलाट शिल्लक आहेत असे खोटेच सांगावे व फलाट गळ्यात बांधावा तसेच आगाऊ
रक्कम हस्तगत करावी व त्याची पावती द्यावी.

CONSTRUCTION बांधकाम-

जास्त समाजसेवा वा बांधिलकी
किंवा माणुसकी न दाखवता शक्य तितके हलक्या दर्जाची सामुग्री वापरून
बांधकाम सुरु करावे, व जास्तीत जास्त माजले बांधण्याचा प्रयत्न करावा .
एकदा का सर्व फलाट विकले गेले की तर बिल्डिंग मेंटेनन्स कडे ढुंकून हि
पाहू नये. त्याच बरोबर घाई घाई ने बांधकाम उकरण्याचा प्रयत्न करावा, असे
केल्याने धनरूपी द्रव्याची बचत तर होतेच व ग्राहकांवर चांगला प्रभाव
पडतो, तसेच आगाऊ रक्कमहि वाढवून घेता येते.

POSSESSION पजेशन-

बिल्डिंग अर्ध्पूर्ण अवस्थेतच काही
इच्छुक ग्राहकांना पजेशन देऊन टाकावे व संपूर्ण फुल-फायनल रक्कम गिळंकृत
करावी. त्यानंतर बिल्डिंगला कुठलेतरी छान नाव देऊन ती अधिकृत सोसायटी आहे
असे स्वयं घोषित करावे. (ती बिल्डिंग अनधिकृत असली तरी ). एकदा का
बिल्डिंग तयार झाली तर नंतरचे फलाटचे पजेस देताना ग्राहकाला खोळंबवावे व
त्याचा संयम (अंत ) पाहावा. असे केल्याने त्याची पुढील होणारी कुरबुर
थांबते.
बिल्डर व्यवसायात लोकांचा तळतळाट,शिव्या
शाप यांना अधिक महत्व द्यायचे नसते फक्त आपले उखळ पांढरे करून घेणे यास
प्राधान्य देणे आवश्यक असते.

EMERGENCY आणीबाणी-

अर्थात कधी कधी बिल्डिंग हि अनधिकृत असल्यामुळे व
ढिसाळ निकृष्ट प्रतिच्या बांधकामामुळे ती पडते किंवा ती अनधिकृत घोषित
करण्यात येते तेव्हा बिल्डरच्या ऑफिसमध्ये फलातधारकांच्या चकरा वाढू
लागतात , अशा वेळी जर कोणता फलातधारक तक्रार घेऊन आलाच तर त्यास आपल्या
नवीन प्रोजेक्ट नवीन बांधकामा बद्दल माहिती द्यावी व तेथे बुकिंग करावयास
सांगावे. व तेथे त्यास डिसकाउंट देण्याचे आश्वासन करावे, पण रक्कम मात्र
तेवढीच जास्त वसूल करावी. या वेळी झालेल्या फलाट धारकाच्या आगमनास पूर्वी
इतके महत्त्व देण्याची मुळीच गरज नाही. अशा वेळी त्याचा हातातील
शीतपेयाची बाटली काढून घेऊन त्याचा देखत नवीन संभावित ग्राहकास दिली तरी
चालेल.
कधी कधी फलात धारक विचलित होऊन जर
तुमच्या ऑफिस मध्ये मोठ्याने आवाज चढवू लागला तर सरळ खुर्चीवरून उठावे व
लगेचच त्याचा कानाखाली आवाज काढावा. असे केल्याने तो फलाट धारक तर गप्प
बसतोच व इतर फलाट धारकांवरही जरब बसते.

जेव्हा गोष्ट फलाट धारकांचा
युनियनची येते तेव्हा आपले पदरी बाळगलेले अंगरक्षक (गुंड) कामी येतात. व
त्या युनियन ला देखील चौदावे रत्न दाखविल्याने परत युनियन करण्याचे फलाट
धारकास स्वप्न ही पडत नाही.
जर फलाट धारक या मध्ये पोलिसांची मदत घेऊ लागला तर आलेल्या पोलिसांचा
योग्य तो सत्कार करून त्यांना काही हवे नको ते विचारावे व संन्यासाचा आव
आणावा.
या नंतर ही एक शेवटची वाट शिल्लक राहते ती म्हणजे "न्यायलय".
"शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी
चढू नये" असे कुणीतरी खरेच सांगितले आहे त्याचा प्रोसेस जर फसगत झालेल्या
फलाट धारकाला कळला तर तो जीव देणेच पसंत करील. तर मग आमच्या भावी बांधकाम
व्यावसायीकांनो आहे की नाही हा फायदेशीर उद्योग. पुढील वेळी पुन्हा
भेटूच आणखी काही फायदेशीर व सोपे उद्योगांचा इत्यंभूत मार्गदर्शनासह तो
पर्यंत नमस्कार ..........

निष्प्रभ

निष्प्रभ

मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.

दाराकडे वाट पाहत नव्हते कुणी, अंधार होता.
दिवसा मी स्वतःच वेळ तपासत बसतो.

कधी ती तर कधी तो काळ अविरत होता
पारावरचा लोळ हळूच लपत डोकावतो.

मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.

वारा नेहमीच लिहू देत नाही असे नाही
तीत लिहिताना हात थरथरत असतो
मी नाही तो अद्वैत आवेगच लिहित होता
ते दिन गेले तरी वचने पुन्हा आठवतो

मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो

कधी दौत सांडते त्यावर तर कधी धूळ साचते
कागद झटकतो अकस्मात तो माझा त्वेषच असतो
करत त्या कागदाचे तुकडे पुन्हा तेच आठवतो
रडतो हतबल डोळे पुसतो हातांनी उचलत असतो

मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.

या महागाईमध्ये आपल्या प्रेयसी ला खुश करण्याचे स्वस्त आणि मस्त उपाय...

या महागाईमध्ये आपल्या प्रेयसी ला खुश करण्याचे स्वस्त आणि मस्त उपाय...

१- तिला या दुकानातील स्पेशालिटी आहे करून चहा पाजावा. याच प्रकारे आपली संस्कृती आहे म्हणून इंडिअन रास्ता फूडच रेकॉम्मंड करावे.
२- तिला महागडे गिफ्ट विशेषतः घड्याळ वगेरे घेऊन देण्यापेक्षा लिंक रोड वरील सुंन्दर पण स्वस्त घड्याळ गिफ्ट म्हणून द्यावे जास्त काही म्हणाली तर तू आउट ऑफ फ्याशन आहेस नेहमी ट्रेंड बदलतात वगेरे ऐकवावे.
३- कधी जास्त हट्ट केलाच तर तिला जवळील हिल स्टेशन वर घेऊन जाण्यापेक्षा जवळील प्रेक्षणीय स्थळ वगेरे म्हणजे १०-१५ किमी पर्यंत आटपावे व माझी dignity मला परवानगी देत नाही असे बोल बचन द्यावे.
४- मूवी ला जाण्याचा हट्टाला मराठी बाण्याचा आव आणून मला हिंदी सिनेमे जास्त आवडत नाहीत, असे आखडून सांगावे. तसे पण मराठी सिनेमे आजच्या hi -fi प्रेयासिंना पाहावेसे वाटत नाहीत.
५- वरील सर्व उपायांचा जास्त प्रमाणात वापर केला असता तुमची प्रेयसी साशंक होईल यावर तिला आपल्या प्रेमाचा आणा भाका आठववाव्यात. व तू सर्व गोष्टीन मध्ये पैसा का सामील करतेस असे दयनीय मुद्रेने विचारावे.
६-वरील सर्व उपाय ज्याचे त्याने आपल्या जोखमी वर करावयाचे असून याने होणाऱ्या कुठल्या हि शारीरिक, मानसिक, आर्थिक हानीस व मानहानीस लेखक/सूचक जवाबदार राहणार नाही.

कृपया लेखकाचे नाव विचारू नये.

-नाव न सांगण्याच्या अटीवरून

नववर्ष कामना

नववर्ष कामना

नमस्कार..

सर्वप्रथम नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! सध्या मी मराठी गाजत आहे असे म्हणावे लागेल कारण खूप नवीन छान छान सदस्य सहभागी झाले आहेत. त्यांना तसेच प्रस्थापितांसाठी माझ्या मनापासून या खालील शुभ-कामना

मी कामना करतो की नवीन वर्ष आपणा सगळ्यांसाठी आनंद आणि सुख घेऊन येवो. अगदी तितकेच जितके की मा.शरद व अजित पवारांसाठी नेहमी येते. राष्ट्रवादीचे detergent च इतके strong आहे. की त्यांचावर लागणारे डाग असे काही धुतले जातात की राष्ट्रवादीवाले म्हणतात कि दाग ढूंढते ही रह जाओगे..
मी कामना करतो की नवीन वर्ष आपणा सगळ्यांसाठी तितकीच प्रगती घेऊन येवो जितकी की गडकरी साहेबांकरता.... नागपूरचा आशीर्वाद कामी आला.
मी कामना करतो की नवीन वर्ष आपणा सगळ्यांसाठी तितकीच शांती घेऊन येवो जितकी की पुणे महानगरपालिकेला आवडते.
मी कामना करतो की आपली कुठलीही यात्रा इतकी सुरक्षित असावी जितकी की भारत भेटीस येणाऱ्या ओबामांची पण तितकी खर्चिक नसावी. तसेच कामना करतो की बसेस मधील कर्मचारी आपल्या बरोबर सौजन्याने वागावेत आणि त्यातील पाकीटमारांपासून आपले रक्षण व्हावे. रस्त्यावरून जाताना धीन्डांच्या bikes आणि bmws ने तुम्हाला लक्ष न करता सावकाश पुढे जावे तसेच कामना करेन की आपल्या कानांना व मनाला इतकी बळकटी यावी की वर त्यांचा शिव्या शापाचा तुमच्या वर काहीच परिणाम होऊ नये.
मी कामना करतो की की कांदा लसूण मसाले डाळी भाज्या इतके स्वस्त व्हावेत की ते खाताना शेजाऱ्यांची दृष्ट लागू नये.
मी कामना करतो की सध्या आपल्या सगळ्यांना खाणे जैन लोकांप्रमाणे खाण्याची लवकरात लवकर सवय व्हावी ..
(टीप - कांदा लसूण तामसी पदार्थ आहेत यांचा उपयोग टाळा भाव कामी होई पर्यंत)

आपल्या सर्वांना नववर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा.

सुंदर मराठी चित्रपटांचा करुण अंत

सुंदर मराठी चित्रपटांचा करुण अंत

खरच असच म्हणतात आज काल निकृष्ट दर्जाच्या मार्केटिंगमुळे सोन्यासारख्या मराठी चित्रपटांचे मरण होत आहे. राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपट खरे उतरत असताना हे चित्रपट व्यवसाय का करू शकत नाहीत. कला सादर करावी पण त्याची ख्याती प्रसिद्धी होणे देखील गरजेचे आहे.योग्य अनुदान, मार्गदर्शन, स्वविकसित, स्व -इच्छुक व्यावसायीकरण अवलंब केल्याने हा प्रश्न सोपा होऊ शकतो. निर्मात्यांनी सर्वप्रथम आपल्या इच्छ्शक्तीची मदत घ्यावी. हे लक्षात घ्यावे कि मराठी माणूस या भारतात चित्रपट सृष्टीस जन्म देऊ शकतो तर त्याचे यशस्वी व्यावसायीकरण देखील करू शकतो. अनुदानाची चिंधी ओढ्ण्यापेक्षा काही नवा मार्ग सापडतो का ते पाहावे. त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे कि इथे निर्बल सरकार नागरिकांच्या मुलभूत सुविधांकरता तोकडे ठरतेय मग या करुण मराठी चित्रपटसृष्टीचा नंबर कोठून येईल.
फक्त documentrya सादर करण्यापेक्षा मसाला मूवीस पण बनवाव्यात सध्या रसिकांना खेचण्याकडे त्यांचा कल असावा असे माझे मत आहे. याची आवश्यकता यासाठी वाटते कि क्षमता असून होणारा सुंदर चित्रपटांचा करुण अंत पाहवत नाही. मी मराठीतील सदस्यांची भक्कम आणि लांबच्या लांब शृंखलेचा उपयोग जर नवीन मराठी चित्रपटांच्या प्रचारासाठी करता आला तर ते सोन्याहून पिवळे असेल हे नक्कीच, मालकांनी याबाबत विचार करावा. कोणी नसेल तर आपणच सुरवात करूया ना!!! मी upcoming मराठी चित्रपटाचा प्रचार माझ्या स्वतःच्या facebook account मध्ये करणार आहे, आणि हेच माझे new year resolution आहे.जगातील प्रत्येक गोष्टीचा चांगला तसा वाईट वापर हि करता येतो मी एक चांगला वापर सुचवला आहे.

जोगवा- great movie but cudnt watch in the theatres becuz no one marketed the movie properly. very well... such gr8 marathi films are dying unnoticed n we r spending hundreds of bucks in watching stupid storeyless hindi movies...

this is only 1 example i have the list.