Wednesday, August 17, 2011

एक मैत्र जसा मज तू लाभते...

एक पहाट विस्मय तू भासते
तुझे हास्य मन पुन्हा मागते
स्वच्छंद रहातो मी दुख विसरुनी
एक मैत्र जसा मज तू लाभते

का इतके मनी दुख लपवितेस
हास्य मुखवटा पण श्वास कोंडतेस
ओळखून आहे ते सत्य आतुनी
अनंती सर्वस्व तुझे, तू तिलाच आठवतेस

असे नेत्र मज अर्थ सांगतात
तुज हून अधिक मज तेच भेटतात
वेळ काळ मी विस्मरुनी जातो
दिनरात शब्द हे तुलाच स्मरतात

असा श्वास जर तुझा मी असतो
तुझा उछ्वास तो मला समजतो
पाउले चालता ती तुझ्या बरोबर
तुझा मैत्र मी, गर्व भासतो...

No comments:

Post a Comment