Sunday, May 29, 2011

Mission Dragon hunt !!!

Mission Dragon hunt !!!

आताच एक documentry पाहिली dd1 वर, ती तिबेटीयन refugies बद्दल होती जे आता पूर्व भारतात शरणार्थी म्हणून आहेत. तिबेटवर चीनच्या हक्कानंतर बेघर, हतबल झालेले चेहरे पाहून हृदय आटून येते. त्यांच्या राहणीमानापासून , त्यांच्यावर चीनी सैनिकांनी केलेले अतोनात जुलूम सर्व कहाणी पाहता आली. चीनचा साम्राज्यवाद पाहता उद्या आपला पूर्व प्रदेश हि त्यांना सोपवावा लागेल असे राहून वाटते.
भारताच्या या मध्यस्थ धोरणाची कीव करावीशी वाटते, कारण आज तिबेट वर जो प्रसंग आहे उद्या आपली पाळी आहे. भारताने चीनच्या साम्राज्यावादाबद्दल आजवर कितीसा विरोध केला आहे, किंवा या प्रश्नाला पाकिस्तान सारखी प्राथमिकता दिली आहे ? आज हा प्रश्न मी, उद्या जनता विचारेल ?
अहो!!! इथे आपलेच नेसणे सावरत नाही आणि आपण कशाला जाऊ दुसऱ्यांच झाकायला ? भ्रष्टाचार, आणि आंतरिक मतभेद व इतर समस्या यातून जर का बाहेर येण्यास वेळ मिळाला तर करू ना मदत ? भारतावर चीनी आक्रमण होणार हि काळ्या दगडावरील रेष आहे हे देश हितचिंतकांनी लक्षात ठेवावे, इथे त्यांना भारतास घेरा घालण्याची संधी आपणच देत आहोत हे विसरून चालणार नाही.
चीन अरुणाचल प्रदेशावर स्वतःचा हक्क सांगत आहे, फक्त त्यालाच आमचा विरोध असेल कारण तो भारतात आहे?? चीनव्याप्त भारतातील तसेच इतर देशातील प्रदेश चीन झपाट्याने विकसित करीत आहे रस्ते, वीज, पाणी, लोकांना स्टेपल विसा देणे, व इतर जे भारतातील नाकरत्यांना बापजन्मात कधी जमणार नाही. आपण फक्त हि बातमी ओबामांना कळवायची, मग ते कुठले तरी ऐतिहासिक वाक्य बोलतील याची अपेक्षा करायची ?
सरळ सांगायचं झाल आपल आपणच निस्तरायला लागणार, US पण चीनला टरकून आहे हे विसरू नये!! आधी स्वतःची मदत तर करा दुसरे नंतर येतील मदत करायला as simple as that !!!

No comments:

Post a Comment