Sunday, May 29, 2011

रुसलेल्या त्या उद्यानी.... (माझा प्रेमदिन)

मन वाट पहात असत प्रेमदिनी
हाक येत नाही रुसलेल्या त्या उद्यानी.

शिवाय प्रेमाच्या या माझ्या मनी
नेहमी वर्शितात उपेक्षेची वादळे
अकस्मेचा दौतीत गुंतते माझी नजर
कान हि तहानलेत या शांततेनी

मन वाट पहात असत प्रेमदिनी
हाक येत नाही रुसलेल्या त्या उद्यानी.

आर्त उसासे उरलेल्या स्मिताचे
विचलित तुकडे ते हृदयाचे
उचलेल कुणी का मायेने
पायी तुडवून का गेले कुणी

मन वाट पहात असत प्रेमदिनी
हाक येत नाही रुसलेल्या त्या उद्यानी.

मजकूर उन्हाचा उमटत असे
लपवित जखमेचे डाग रडे
पडसाद कसे केंव्हा न कळे
आसव पिते हलकेच कुणी

मन वाट पहात असत प्रेमदिनी
हाक येत नाही रुसलेल्या त्या उद्यानी....

No comments:

Post a Comment