धोनीच्या नावाने स्टेडीयम चे नामकरण होत आहे. आपल्या सचिनच्या नावाने वानखेडे मध्ये एकच stand ???
सचिनचे कार्य आजतागायत आलेल्या सर्व खेळाडूंपेक्षा सरस आहे. सचिनच्या नावाने स्टेडीयम बनवणे हे महाराष्ट्र सरकारच्या इच्छेवर आहे. पण मनात असेल तर ना. नको तिकडे पैसा खर्च करून त्यावर मलई कमावून जर थोडा पैसा वाचला तेव्हा कुठे बिचाऱ्या सचिनचा नंबर येईल. भारतरत्न साठी जो आवाज उठलेला तो कुठे दडपला गेला काही पत्ता नाही, इकडे सचिन आपल्या हेल्मेटवर bcci च्या लोगो खाली तिरंगा लावतो तर त्याच्यावर बोटे उठतात, तिरंगा सदृश्य केक कापतो (जरी तो bcci नेच प्रायोजित केला असला तरी ) त्याचावर टीका होते. आज तक नामक दिल्लीचे private लिमिटेड channel सेहवाग गंभीर व इतर दिल्लीकरांना डोक्यावर घेते. फक्त हेच सहन करायचे, महाराष्ट्र सरकार व नेत्यांनी नेहमीच यावर नपुंसकाची भूमिका अंगिकारली आहे. हे लिहिण्या मागचे कारण म्हणजे हेच - सचिनला ती वागणूक मिळत नाहीये जी परदेशात अशी विश्वव्यापी कामगिरी करणाऱ्या एखाद्या खेळाडूला मिळाली असती.
अशा नेत्यांचा अशा सरकारचा व अशा मिडीयाचा त्रिवार धिक्कार असो!!!!!
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
Sunday, May 29, 2011
आपल्या सचिनच्या नावाने वानखेडे मध्ये एकच stand ???
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment