Sunday, May 29, 2011

तू सोडून गेलीस तेव्हा

तू सोडून गेलीस तेव्हा

तू सोडून गेलीस तेव्हा
पाणी गळयामधून उतरत नाही. घसा ओढावतो
जाऊदे पाणीच जड होत आज.

तू सोडून गेलीस तेव्हा
श्वास घेववत नाही कोंदट होतो, नकोसा होतो
वाटत सध्या हवाच बदलली आहे आज.

तू सोडून गेलीस तेव्हा
गिळवत नाही अन्नाचा घास तोंडात फिरत असतो
भूक मेलीये वाटत आज.

तू सोडून गेलीस तेव्हा
मन लागत नाही कशात, घरात बसून असतो.
काम सोडून दिलंय केव्हाच.

तू सोडून गेलीस तेव्हा
कुणी आपलेसे वाटत नाही, तुलाच आठवतो
खूप आठवण येतेय आज.

तू सोडून गेलीस तेव्हा
भास होतायत तुझेच, डोळेच बंद करतो
अश्रू येत आहेत आज.

जेव्हा तू सोडून गेलीस तेव्हा....

No comments:

Post a Comment