Sunday, May 29, 2011

न जुळणारे दोन नदी किनारे

सोबत वाहतो जरी मनाने.
न जुळणारे दोन नदी किनारे ....
सूक्ष्म रेखा दोहोंमध्ये भासते.
भिंत काचेची दरम्यान लागते

अवखळत वाहते तुझी हि धारा
माझे जगणे खडकाळ पसारा
तुझ्या पाण्यात जीवन सारे
माझे पाणी विराण नजारा

सोबत वाहतो जरी मनाने.
न जुळणारे दोन नदी किनारे ....

अजब कहाणी माझ्या किनाऱ्याची
तुझ्या ऐकिवात सागराच्या गोष्टी
मन ओथंबून जाउ दे किनाऱ्याचे
विध्वंस जलाशय रोगट माती

सोबत वाहतो जरी मनाने.
न जुळणारे दोन नदी किनारे ....

आभाळाची छाया तुझ्या त्या पात्री
माझ्या पाण्याला दगडांची कात्री
रोमहर्षक तुझा तो प्रवाह
माझ्या नशिबात हा कुंडांचा दाह.

सोबत वाहतो जरी मनाने.
न जुळणारे दोन नदी किनारे ....

मुरले पाणी किनाऱ्याचे अर्ध्यावर
तुला मिळाला अखंड सागर
झाले तुझे असे जीवन पावन
लोपित असता वळतो आशेने.

सोबत वाहतो जरी मनाने.
न जुळणारे दोन नदी किनारे ....

No comments:

Post a Comment