Sunday, May 29, 2011

वास्तू - एक जिवंत शक्ती.

वास्तू - एक जिवंत शक्ती.

मी नवीन घरात शिफ्ट होत आहे. हा लेख लिहावासा वाटतो कारण मागील काही दिवसापासून आलेले अनुभव आपणास कळावेत. मी वास्तू वगेरे बद्दल इतका जागरूक नव्हतो, पण आता आहे. आम्ही आमच्या या घरी १९९२ पासून राहतो. जेव्हा येथे आलो होतो वडलांना १८०० रू . पगार होता. येथे शिकलो, मोठे झालो. कधी आजारपणात किवा कशात हि नुकसान झाले नाही. प्रकृतीस्वास्थ हि लाभले. आता जागा लहान पडत असल्या कारणाने दुसरे घर विकत घेतले आहे. त्यामुळे जुने घर विकावे लागत आहे.जुने घर विकायचे म्हटल्यावर आई खूप भावनिक झाली व उदास राहू लागली.कधी कधी रडत होती, मधेच हात जोडून देवासमोर तर कधी आमच्या हॉल मध्ये प्रार्थना करत होती. मला कळत नव्हते, आईला या संधर्भात विचारले असता म्हणाली ती वास्तू (जागेवाला) ची क्षमा मागत होती. कारण खालील अडचणी वडलांच्या मार्गात येत होत्या आणि घराच्या हि......

१- घराचा दरवाजा बंद होत नव्हता - रोज जो दरवाजा नीट व लगेच बंद व्हायचा तो बंद करण्याकरता आता पूर्ण शक्ती लावावी लागते, दरवाजा नीट तपासल्या नंतर हि काही प्रोब्लेम आढळला नाही,
२- घरातील पाण्याच्या टाकीतून पाणी गळू लागले.
३- वडलांची प्रकृती बिघडली
४- घराला कधी नव्हे त्या मुंग्या लागल्या
५- खिडकीत लावलेली लक्ष्मी वेल अचानक सुकू लागली.
६- जागेला दलाल तर भरपूर होते पण जागा विकली जातच नव्हती.
७-माझा जॉब सुटला.

या पैकी क्रमांक १ आणि ४ मला पूर्णपणे पटल्या कारण या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडल्या. आई ने प्रार्थना केल्या वर क्रमांक ७ आणि ५ सोडून सर्व अडचणी दूर झाल्या आता bank of america जात आहे.

अनुभव कळवा ....

No comments:

Post a Comment