Sunday, May 29, 2011

मैत्रीण.......

...साधी सोज्वळ निरागस होती
पण जगाचे भान मित्रत्वाची सान
चांगलेच ओळखून होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी
हातात हात नसेल कदाचित
पण डोळ्यानेच मला समजून घेत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते
फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो
ती हि कधी हा विचार करत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा
कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो
माझ्यासाठी वाट पाहत घराबाहेर उभी होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी आहे का
पण दुसरे मन मित्ररेखेच्या आतच खेचायचे
ती बिचारी मनात मित्रताच सांभाळत होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...माझे मित्र मला तीचे नाव घेऊन चिडवायचे
एकदा तर गोष्ट हातघाईवर आली होती
हात खेचून मला घोळक्यातून बाहेर घेऊन आली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...हे नाते निखळ मैत्रीचेच होते
प्रेमापेक्षा कितीतरी अधिक महान होते
कधी एकमेकांकडून तशी अपेक्षाच केली नव्हती.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...आता मात्र वाटत मैत्रीचे प्रेमात रुपांतर का होते?
तिला स्वच्छंद जगण्याचा हक्क नव्हता का
कि मला मित्र बनवणे का तिची चूक होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...एकदा मित्रांच्या सांगण्यावरून तिचा हात धरला होता
गम्मत म्हणून केले होते सगळे पण हसे तिचे झाले.
एका शब्दा ने मला ती काही बोलली नव्हती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...आजकाल मी एकटाच जात होतो कॉलेजला
परवा पासून कोणी वाट हि पाहत नव्हत घराबाहेर
तेव्हा मित्र विचारत होते कि ती कुठे होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...मला वाटल कि काय करून बसलो
मित्रांचा सांगण्यावर चांगला मैत्र गमावून बसलो
पण अचानक ती काल भेटली
म्हणाली सख्या मी तर इथे आली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती...

...क्षमा मागितली असता मी तिची
पण तरी हसून वेडा आहेस का म्हणून गेली
आज पुन्हा ती माझ्या घराबाहेर दिसली होती
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती..
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती................

No comments:

Post a Comment