निष्प्रभ
मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.
दाराकडे वाट पाहत नव्हते कुणी, अंधार होता.
दिवसा मी स्वतःच वेळ तपासत बसतो.
कधी ती तर कधी तो काळ अविरत होता
पारावरचा लोळ हळूच लपत डोकावतो.
मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.
वारा नेहमीच लिहू देत नाही असे नाही
तीत लिहिताना हात थरथरत असतो
मी नाही तो अद्वैत आवेगच लिहित होता
ते दिन गेले तरी वचने पुन्हा आठवतो
मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो
कधी दौत सांडते त्यावर तर कधी धूळ साचते
कागद झटकतो अकस्मात तो माझा त्वेषच असतो
करत त्या कागदाचे तुकडे पुन्हा तेच आठवतो
रडतो हतबल डोळे पुसतो हातांनी उचलत असतो
मग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो त्या कागदाचे निष्प्रभ तुकडे
उडतात परत खाली पडतात, सांभाळतो.
No comments:
Post a Comment