व्यथित...
असाच पाहत असेन कधीतरी
अधरी हृदय व्यथित असताना ...
मन फुलांचे सागर होईल
तूलाच तेथे पाहताना...
असे स्मित ते सुखावूनी जाई
आसव धारा वाहताना...
सुन्न पारिजात दरवळे असा
तुझेच चित्र हे पाहताना...
मनी कवडसे विखरित राही
ते उन तुझ्यावर पडताना...
असाच पाहत असेन कधीतरी
अधरी हृदय व्यथित असताना ...
No comments:
Post a Comment