Sunday, May 29, 2011

सचिन देवाची आरती !

http://www.mimarathi.net/node/5925 इथे सचिन च्या कामगिरी विषयी काही मौलिक विचार , प्रतिसाद , मतमतांतरे वाचनात आले.... त्या वरून रचलेली ही आरती...!

! सचिन देवाची आरती !

जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....

कुणी म्हणे तुमची सेंच्युरी नको
भारत हरतो म्हणे खात्रीने लेको
नर्व्हस नाईंटी, दहा-पंधरा धावा
एवढ्याच तुम्ही काढाव्या देवा
तेंव्हा इतर खेळतील मोठ्या भक्ती भावा...
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....

एकवीस वर्षे वाट पाहिली तुम्ही देवा
वर्ल्डकप जिंकायाला धोनीच हवा
तुमचे कौतुक करता दोष लागती
महापातकांचे डोंगर उभे राहती
व्यक्तीपूजक म्हणूनी लोकं हिणविती देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....

आकडेवारी ती दाखवूच नका
स्टॅटीस्टिक ते इंद्रजाल बघा
सांघिक यश ते खरे यश देवा
मॅन ऑफ दि मॅच चा नका खाऊ मेवा
आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
- समीर पु.नाईक

No comments:

Post a Comment