सचिन एकटाच man of the match मग बाकीचे १० खेळाडू कोण ???
सचिनची सेन्चुरी = भारताचा पराभव. हे कोणत्या महामुर्खाचे म्हणणे आहे तेच मला समजत नाही. जर सचिन १०० धावा बनवून देखील बाकीचे आपले अवसान गाळून बसतात (अर्थात या पाठी काय psychology आहे ते पाहणे आवश्यक आहे. ) मग त्यांनी क्रिकेट न खेळलेलेच बरे. क्रिकेट हा सांघिक खेळ असून एकट्या दुकट्याच्या खेळाने कधीच जिंकला जात नाही जाणार हि नाही. जर एखादा ज्येष्ठ खेळाडू किशोराप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ होऊन खेळत असेल आणि स्वतः चा अनुभव पणास लावून मार्गदर्शन करत असेल तर त्याचा खेळीला साजेसा खेळ करून जवाबदारीने खेळ जिंकण्याचा १०१% प्रयत्न केलाच पाहिजे. सचिन बरोबर क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे सौभाग्य आहे. माझ्या मते जर भविष्यात सचिन हा नेदर्लंडचा प्रशिक्षक झाला तर ती टीम विश्वचषक जिंकण्यास पात्र ठरू शकेल. हेच सांगणे आहे सांघिक कामगिरी करा आणि आपल्या आधीच्या फलंदाजाने उत्कृष्ट खेळ केला तर माझी जवाबदारी आहे कि त्याची ती खेळी वाया जाता कामा नये. म्हणून सचिन एकटाच man of the match मग बाकीचे १० खेळाडू कोण??? हा विचार मनात ठेवला तरी पुरे!!!
No comments:
Post a Comment