खरच आहे धकाधकी च्या जीवनात स्वतः साठी वेळ नसतो. तरीही मित्रांनो थोडा वेळ काढूयाच. विचार करा. चिमण्यांची चिव चिव ऐकू येते का आजकाल ? बगळे दिसतात का? पोपटांचा थवा उडताना पाहता का ? गिधाडे दिसतात ? दर उन्हाळ्यात पाण्याअभावी यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काय ? यात मी काय करू शकतो? छोटीशी मदत कराल? आपल्या terrace वर एका जुन्या प्लास्टिक च्या पसरट मोठ्या भांड्यामध्ये पाण्याची व्यवस्था करू शकाल? पक्ष्यांना पाणी देण्यासारखे पुण्यकर्म देखील होईल आणि ती चिव चिव ती शीळ व ती माळफुले गगनी अविरत राहतील. बाकी आपल्या मुलांना ? नातवंडांना मजेत बोट दाखवून सांगा ती बघ चिऊ तो बघ विठू.......
No comments:
Post a Comment