Sunday, May 29, 2011

तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

स्वप्नात येतेस, मनास झुलवतेस
तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

तू हसतेस, हसून लाजतेस
भेटतेस कधी, कधी न भेटून रडवतेस
अश्रू माझे तूच पितेस
तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

सुंदर दिसतेस, मनी वसतेस
पाहतो तुला मी चेहरा लपवितेस
अकस्मात कानी तूच गुणगुणतेस
तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

वाट बघतेस, कंटाळून रागावतेस
नेहमी असाच करतोस! म्हणून सुनावतेस
मला माफ करतेस, जवळ येतेस
तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस

धुंदीत असतेस, ह्रिदयी दरवळतेस
आनंदी असतो जेव्हा तू सोबत असतेस
स्वप्नीच येशील का प्रत्यक्ष भेटतेस?
कारण ..
तुझी शप्पथ मला तू खूप आवडतेस .

Love you Desperately !!!

No comments:

Post a Comment