Sunday, May 29, 2011

हिंदू - मुस्लीम व इतर आंतरजातीय विवाह !!!

हिंदू - मुस्लीम व इतर आंतरजातीय विवाह !!!

हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे adjust करण्याची तयारी असेल. आणि जोडीदाराबरोबर संपूर्ण भरवसा असेल. तर हरकत नाही. उदा - मुस्लीम पुरुष ४ विवाह करू शकतात. अशी पण उदाहरणे मुंबईत आहेत कि एका मुस्लीम व्यक्तीने १ हिंदू व १ मुस्लीम स्त्री बरोबर निकाह केला त्या हिंदू मुलीला इस्लाम स्वीकारावा लागला, सहमत आहे पण असे माझ्या ऑफिस मधील एक उदाहरण पण आहे कि ज्यात एक मुस्लीम तरुणीचे एका गुजराती हिंदू मुलाबरोबर अफेयर आहे पण तिच्या वडलांची तेव्हाच परवानगी असेल जेव्हा हा गुजराती हिंदू तरुण इस्लाम स्वीकारेल. आपली प्रभू रामचंद्राच्या आदर्श मानणारी एकपत्नी व्रत संस्कृती आहे, निवड ज्यांची त्यांची. कधी कधी वाटते हिंदू आपल्या मुलांवर जे संस्कार करतात तेच याला कारणीभूत आहे उदा. सर्व धर्मांचा आदर करा. प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे हिंदू धर्म कधी इतर धर्मियांप्रमाणे हे शिकवीत नाही कि जो आमच्या देवाला मानणारा नाही तो आपला शत्रू आहे काफर आहे. हि खरच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरीही एक राहून राहून वाटते कि स्वतःच्या अस्तित्वासाठी आपल्या माता -पितांबरोबर तसेच संपूर्ण पुरुषांशी झगडणाऱ्या या खंबीर हिंदू स्त्रिया लग्न झाल्यावर मात्र सहज धर्मांतरित व्हायला राजी होतात. इतकी कमजोर आहे ह्यांची हिंदू धर्मश्रद्धा ?? सर्व जाणकार स्त्रियांनी यावर टिप्पणी करावी अशी प्रार्थना!!

No comments:

Post a Comment